Home माझं पिंपरी चिंचवड Marathi Bhasha Week: ‘माय मराठीचे साहित्यविश्व’ चर्चासत्रात मराठी साहित्याच्या परंपरेचा आढावा

Marathi Bhasha Week: ‘माय मराठीचे साहित्यविश्व’ चर्चासत्रात मराठी साहित्याच्या परंपरेचा आढावा

अभिजात मराठी भाषा सप्ताहांतर्गत ‘माय मराठीचे साहित्यविश्व’ चर्चासत्राचे आयोजन. मान्यवरांनी मराठी साहित्याची परंपरा, मानवी भावविश्व आणि भाषेच्या समृद्धीवर विचार मांडले.

by Admin
Spread the love

(पिंपरी) : “मराठी साहित्याला अनेक वर्षांची समृद्ध परंपरा असून त्याचे विश्व व्यापक आहे. मराठी साहित्य हे केवळ शब्दांचे भांडार नसून आपली अस्मिता, इतिहास, संस्कृती, परंपरा, संघर्ष, संवेदना, वेदना आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. काळ, माध्यमे आणि साहित्यशैली बदलत गेल्या, तरी माणसाच्या जगण्याचे प्रश्न, भावविश्व आणि अस्मिता मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी कायम राहिली आहे,” असे विचार साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त (Marathi Bhasha Week)केले.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहांतर्गत पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘माय मराठीचे साहित्यविश्व’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र कांकरिया, ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे, ज्येष्ठ कवी राजन लाखे आणि बहुभाषिक कवी प्रा. संजय पवार यांनी चर्चासत्रात सहभाग(Marathi Bhasha Week) घेतला.

 

डॉ. राजेंद्र कांकरिया म्हणाले, “भाषा ही संवादाचे माध्यम आहे. कालौघात अनेक भाषांच्या संपर्कातून मराठीला नवे शब्द मिळाले आणि त्यामुळे भाषा समृद्ध होत गेली. काही नाटके आणि कवितांवर इंग्रजी साहित्याचा प्रभाव दिसतो. उपेक्षित आणि ग्रामीण समाजातून निर्माण होणारे साहित्य हे अलीकडच्या काळातील महत्त्वाचे वैशिष्ट्य (Marathi Bhasha Week)आहे.”

 

राजेंद्र घावटे यांनी यादवकालापासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेपर्यंतच्या साहित्यिक प्रवासाचा आढावा घेतला. ते म्हणाले, “संतांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला इतर भाषांच्या जोखडातून मुक्त करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. समाजाचे अभिसरण घडविण्यासह राष्ट्रप्रेरणा जागविण्याचे काम मराठी साहित्याने केले आहे. मराठीच्या विविध बोलीभाषांनाही प्रमाणभाषेइतकेच महत्त्व दिले (Marathi Bhasha Week)पाहिजे.”

 

प्रा. संजय पवार यांनी लिखित साहित्यनिर्मितीच्या प्रेरणांवर भाष्य केले. ते म्हणाले, “परकीय आक्रमणांच्या प्रारंभीच्या काळात ‘लीळाचरित्र’ आणि ‘विवेकसिंधू’ यांसारख्या ग्रंथांची निर्मिती झाली. हे मराठीतील आद्य साहित्य म्हणून ओळखले जाते. एकोणिसाव्या शतकानंतर साहित्याची परिभाषा बदलली आणि साहित्यविश्वात मोठे परिवर्तन (Marathi Bhasha Week)घडले.”

 

ज्येष्ठ कवी राजन लाखे यांनी गद्य आणि पद्य साहित्याच्या प्रवासाची सविस्तर मांडणी केली. “ ‘लीळाचरित्र’ हा पहिला गद्यग्रंथ, तर ‘विवेकसिंधू’ हा पहिला पद्यग्रंथ मानला जातो. मात्र, त्यापूर्वीच्या दहाव्या शतकातील ‘ज्योतिषरत्नमाला’सारख्या रचनांचेही पुरावे आढळतात. संत, पंत आणि तंत या परंपरांनी मराठी साहित्य समृद्ध केले. वास्तव, अनुभव आणि कल्पना यांच्या समन्वयातून साहित्यनिर्मिती होणे हे मराठी साहित्याचे वैशिष्ट्य आहे,” असे त्यांनी (Marathi Bhasha Week)सांगितले.

 

चर्चासत्राचे अध्यक्ष राज अहेरराव यांनी नव्या पिढीची भाषा समजून घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “माय मराठीचे अभिजातपण जपणे आवश्यक आहे. त्यासाठी नव्या पिढीला मराठी भाषेचा आणि साहित्याचा प्रवास समजावून सांगितला पाहिजे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या ‘गाथा सप्तशती’मध्ये प्राचीन साहित्यपरंपरेचे दर्शन घडते. सातवाहन राजा हाल याने संकलित केलेला हा महाराष्ट्री प्राकृत भाषेतील गाथांचा संग्रह असून त्यात आदिकाव्य आणि लोकजीवनाचे प्रतिबिंब (Marathi Bhasha Week)दिसते.”

 

चर्चासत्रातील चर्चेचा समन्वय राजेंद्र घावटे यांनी साधला. किशोर केदारी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, तर प्रशासन अधिकारी दत्तात्रय सूर्यवंशी यांनी आभार मानले. संयोजनाची जबाबदारी विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी (Marathi Bhasha Week)सांभाळली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00