(पिंपरी ): अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे ७ ऑक्टोबर रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित निमंत्रित स्थानिक कवींचे संमेलन रंगतदार झाले. विविध विषयांवरील कविता आणि अभिजात मराठी भाषेचा गौरव करणाऱ्या रचनांनी संमेलनात वैविध्यपूर्ण रंग(Marathi Kavi Sammelan) भरले.
या संमेलनात संजय जगताप, दत्तू ठोकळे, शोभा जोशी, जयश्री श्रीखंडे, जयद्रथ आखाडे, आय. के. शेख, प्रदीप गांधलीकर, डॉ. मीनल लाड, बाबू डिसोजा, तुकाराम पाटील, चंद्रकांत धस, पितांबर लोहार, सीमा गांधी, सविता इंगळे, योगिता कोठेकर, माधुरी डिसोजा, प्राची देशपांडे, किशोर केदारी, सुहास घुमरे, नेहा जाधवराव, अशोक सोनवणे, अशोक वाघमारे आणि नीलिमा फाटक यांनी आपल्या कविता सादर केल्या. अभिजात मराठी भाषेच्या विषयावरील रचनांसह विविध ढंगांच्या कवितांना रसिकांची दाद(Marathi Kavi Sammelan) मिळाली.
प्रसिद्ध साहित्यिका सीमा गांधी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत संपूर्ण संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी सूर्यवंशी आणि वैरागर यांनी या वेळी मंचावर उपस्थिती(Marathi Kavi Sammelan) लावली.
३ ऑक्टोबर रोजी साजऱ्या झालेल्या अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त महानगरपालिकेतर्फे ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहांतर्गत आयोजित करण्यात आलेले निमंत्रित स्थानिक कवी संमेलन हा त्याचाच एक भाग (Marathi Kavi Sammelan)होता.